घाऊक चलनवाढ उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

इंधन दरवाढीमुळे एप्रिलमध्ये घाऊक चलनवाढ ३.१८ टक्‍क्‍यांवर पोचली असून, ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. पेट्रोल आणि डिझेलसोबत फळे व भाज्यांच्या भावांत झालेली वाढ महागाईत भर पडण्यास कारणीभूत ठरली आहे. 

मार्चमध्ये घाऊक चलनवाढ २.४७ टक्के होती, तर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती ३.८५ टक्के होती. घाऊक चलनवाढीमध्ये डिसेंबर २०१७ पासून घसरण होत होती. आता एप्रिलपासून पुन्हा ती वाढू लागली आहे. खाद्यपदार्थांचे भाव वाढले असून, जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव भडकल्याने महागाई वाढली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घाऊक चलनवाढ ३.५८ टक्के होती. 

खाद्यपदार्थांच्या भावात एप्रिलमध्ये ०.८७ टक्के वाढ झाली. त्याआधीच्या महिन्यात भावात ०.२९ टक्के घसरण झाली होती. भाज्यांच्या भावातील घसरण एप्रिलमध्ये ०.८९ टक्के असून, ती मार्चमध्ये २.७० टक्के होती. फळांच्या भावातील वाढ १९.४७ टक्के असून, मार्चमध्ये ती ९.२६ टक्के होती. इंधन व ऊर्जा क्षेत्रातील महागाई मार्चमध्ये ४.७० टक्के होती, ती एप्रिलमध्ये ७.८५ टक्‍क्‍यांवर पोचली आहे. जागतिक पातळीवर कच्चे तेल वधारल्याने देशात इंधनाचे दर भडकले आहेत. एप्रिलमध्ये पेट्रोलच्या दरात ९.४५ टक्के, डिझेलच्या दरात १३.०१ टक्के वाढ झाली आहे. 

चलनवाढीचा आलेख चालू तिमाहीत चढता राहणार आहे. ई-वे बिल लागू केल्यानंतर वस्तू व सेवा करातून मिळणारा महसूल स्थिरावण्याची प्रतीक्षा सरकार करत आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याबाबत सरकारकडून निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 
- आदिती नायर,  प्रधान अर्थतज्ज्ञ, इक्रा 

घाऊक चलनवाढ 
मार्च - २.४७ टक्के 
एप्रिल - ३.१८ टक्के 
एप्रिल २०१७ - ३.८५ टक्के

Web Title: Inflation due to fuel prices