चलनवाढीचा 30 महिन्यांतील उच्चांक 

पीटीआय
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : घाऊक चलनवाढ जानेवारी महिन्यात 5.25 टक्‍क्‍यांवर पोचली असून, ही मागील 30 महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशांतर्गत इंधनाचे भाव कडाडल्यमुळे चलनवाढीचा आलेख चढता राहिला आहे.

घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. डिसेंबर महिन्यात घाऊक चलनवाढ 3.39 टक्के होती. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ती उणे 1.07 टक्के होती. या आधी जुलै 2014 मध्ये 5.41 टक्के एवढी उच्चांकी चलनवाढ नोंदविण्यात आली होती.

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील चलनवाढ डिसेंबरमध्ये 8.65 टक्के होती. जानेवारीमध्ये ती दुपटीपेक्षा अधिक वाढून 18.14 टक्‍क्‍यांवर गेली. डिझेल व पेट्रोलची चलनवाढ अनुक्रमे 31.10 व 15.66 टक्के आहे. तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'ने प्रथमच आठ वर्षांमध्ये डिसेंबर महिन्यात तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढू लागले आहेत. द्रवरूप नैसर्गिक वायूची (एलएनजी) किंमत प्रति एमएबीटीयू 5.25 डॉलरवरून 9 डॉलरवर पोचली आहे. 

सरकारी आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांची चलनवाढ डिसेंबरमध्ये उणे 0.70 होती. ती जानेवारीमध्ये उणे 0.56 टक्‍क्‍यांवर आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात यात घसरण नोंदविण्यात आली आहे. भाज्यांची चलनवाढ जानेवारीमध्ये उणे 32.32 टक्के असून, यात सलग पाचव्या महिन्यांत घसरण झाली आहे.

कांद्याची चलनवाढ उणे 28.86 टक्के आहे. डाळींची महागाई डिसेंबरमध्ये 18.12 टक्के होती. जानेवारीमध्ये ती कमी होऊन 6.21 टक्‍क्‍यांवर आली आहे. बटाट्याच्या भावातही घसरण झाली आहे. अंडी, मासे आणि मांसाच्या भावात जानेवारी महिन्यात वाढ झाली आहे. उत्पादित वस्तूंची महागाई वाढून 3.99 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. साखरेच्या भावातही वाढ झाली आहे. 

चलनवाढीचे विरोधाभासी चित्र 
घाऊक चलनवाढीचा आलेख चढता असताना किरकोळ चलनवाढीत मात्र, घसरण होत आहे. जानेवारीमध्ये किरकोळ चलनवाढ 3.17 टक्के आहे. या दोन्हींमध्ये विरोधाभासी चित्र दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये घाऊक चलनवाढ 3.15 टक्के असल्याचे सरकारने सांगितले होते. आज सरकारने सुधारित आकडेवारी जाहीर करीत ही चलनवाढ 3.38 टक्के असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Inflation Indian Economy Oil Finance Ministry