जूनमध्ये महागाईत वाढ; डब्ल्यूपीआय 1.62 टक्के

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित चलनवाढ जूनमध्ये 1.62 टक्क्यांवर पोचली आहे. सलग सतरा महिने नकारात्मक पातळीवर राहिल्यानंतर एप्रिल, मे आणि जून महिन्यात मात्र सकारात्मक पातळीवर राहिली आहे. जागतिक पातळीवर जीवनावश्यक वस्तूंच्या आणि अन्नधान्याच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यात वाढ झाली आहे.

डब्ल्यूपीआय जून महिन्यात 1.62 टक्क्यांवर पोचला आहे. जो त्याआधीच्या महिन्यात (मे) 0.79 टक्के होता. खाद्यपदार्थांची महागाई मे महिन्यात 7.88 टक्क्यांवरून वाढून 8.18 टक्क्यांवर पोचली आहे. प्राथमिक वस्तूंचा महागाई दर 4.55 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर पोचला आहे. मॉन्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे देशभरात भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांचा महागाई दर गेल्या महिन्यात 12.94 टक्के होता. तो आता 16.91 टक्क्यांवर पोचला आहे.

रिझर्व्ह बॅंक पतधोरण आढाव्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक व किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीची आकडेवारी ग्राह्य धरते. किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर वाढल्यास किंवा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दरातील थोडीशी वाढही रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढाव्यावर परिणाम करणारी ठरते. पुढील महिन्यात (ऑगस्ट) रिझर्व्ह बॅंक द्विमाही पतधोरण जाहीर करणार आहे.

Web Title: Inflation rises in June