इन्फोसिसचे तिसऱ्या तिमाहीसाठीचे निकाल 11 जानेवारीला

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई: देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल 11 जानेवारीला जाहीर होणार आहेत. इन्फोसिस तिसऱ्या तिमाही निकालांची घोषणा 11 जानेवारी 2019 ला संध्याकाळी 4:15 वाजता करणार असल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. तिमाही निकालांच्या घोषणेनंतर लगेचच 4:45 वाजेच्या सुमारास कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन पत्रकार परिषद देखील घेणार आहे. यात इन्फोसिसचे वरिष्ठ व्यवस्थापन कंपनीच्या कामगिरी संदर्भातील प्रश्नांना उत्तरे देणार आहे. 

विश्लेषकांच्या अंदाजानुसार तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसला 4,088.60 कोटी रुपयांचा निव्वळ नफा होण्याची शक्यता आहे. तर कंपनीचा महसूल 20,292 कोटींवर पोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तज्ज्ञांनी इन्फोसिसची कामगिरी चांगली झाली असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन कंपनीच्या पथ्यावर पडणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. इन्फोसिसची प्रतिस्पर्धी कंपनी टीसीएस 10 जानेवारीला तिसऱ्या तिमाहीचे  निकाल जाहीर करणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys to Announce Third Quarter Results on January 11