आता इन्फोसिस देखील बायबॅक करणार?

Infosys buyback could happen in April, likely to be over $2.5 billion
Infosys buyback could happen in April, likely to be over $2.5 billion

मुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनंतर (टीसीएस) आयटी क्षेत्रातील इन्फोसिस देखील शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. इन्फोसिसच्या इतिहासात शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर कंपनी पहिल्यांदाच सुमारे 2-2.5 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात सुमारे रु.13,364 ते रु.16,705 कोटी मूल्याच्या बायबॅक योजना आणण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी एप्रिल महिन्यात बायबॅक योजना आणण्याची शक्यता आहे.

सध्या इन्फोसिसकडे रु.35,697 कोटींचा रोख साठा आहे. माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांनी स्वतःकडील रोख संपत्ती गुंतवणूकदारांना हस्तांतरित करण्याच्या मागणीवर टीसीएसनंतर इन्फोसिस देखील गांभीर्याने विचार करत बायबॅकचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आयटी कंपन्यांकडे सध्या रोखीचा साठा वाढत चालला असून भागधारकांना तसेच गुंतवणूकदारांना यात वाटा मिळावा अशी मागणी केली जात आहे. गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास मजबूत करण्यासाठी कंपन्या अनेक कंपन्या शेअर बायबॅक योजनेविषयी विचार करतात.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) संचालक मंडळाने नुकताच 'बायबॅक' योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. त्याअंतर्गत कंपनी प्रतिशेअर 2,850 रुपयांप्रमाणे सुमारे 5.6 कोटी शेअर्स 'बायबॅक' करणार आहे. तसेच याआधी आयटी क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची कंपनी असणार्‍या विप्रोने प्रतिशेअर 625 प्रमाणे सुमारे रू.2500 कोटींचे शेअर बायबॅक केले होते.

काल (गुरुवार) मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर 1009.05 रुपयांवर व्यवहार करत 17.20 रुपयांनी म्हणजेच 1.73 टक्क्यांनी वधारून बंद झाला. पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 900.30 रुपयांची नीचांकी तर 1278 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.231,773.20 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com