इन्फोसिस अधिग्रहणावर लक्ष केंद्रित करणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

भारताची दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी, इन्फोसिसने आगामी काळासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 

मुंबई : भारताची दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी, इन्फोसिसने आगामी काळासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 

येत्या वर्षात विस्ताराची आखणी
इन्फोसिसने व्यवसायाला स्थिरता आणि गती देण्यासाठी पुढच्या तीन वर्षांसाठीचा विस्तार आराखडा तयार केला आहे.कंपनी विस्तार करण्यासाठी या क्षेत्रातील अधिग्रहणावरही लक्ष केंद्रीत करणार आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, सलिल पारेख यांनी यासंदर्भातली माहिती दिली. 

येत्या काळात इन्फोसिस धोरणात्मक गुंतवणुकीवर देखील लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यावर आणि स्थानिक पातळीवरील प्रयत्नावर भर दिला जाणार आहे. कंपनी 70 टक्क्यांपर्यंत रोख भांडवल निर्माण करत शिस्तबद्ध भांडवल वर्गीकरणाची योजना अंमलात आणणार आहे.

भविष्यातल्या मोठ्या संधी
इन्फोसिस आपल्या नवीन धोरणानुसार चालू आर्थिक वर्षात स्थिरतेवर लक्ष केंद्रीत करत पुढील आर्थिक वर्षात त्याला गती देणार आहे. त्यापूढच्या आर्थिक वर्षात विस्ताराचा वेग वाढवत नेण्याचे  कंपनीचे धोरण आहे. बदलत्या काळाची पावले ओळखत कंपनी डिजिटल क्षमता आणि प्राधान्यक्रमाच्या सेवांमध्ये गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्त, ऑटोमेशन, प्रतिभेची पुनर्बांधणी यासारख्या मुद्दयांवरही कंपनीची गुंतवणुकीची योजना आहे.
इन्फोसिसच्या दृष्टिक्षेपात साधारणपणे 160 के 200 बिलियन डॉलरचा व्यवसाय आहे. आपल्याकडे आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा आणि विस्तारत जाणारा व्यवसाय असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.  2018 या आर्थिक वर्षात इन्फोसिसचा डिजिटल महसूल 2.79 बिलियन डॉलरचा होता. कंपनीच्या एकूण महसूलाच्या तो 25.5 टक्के इतका आहे. 

सलिल पारेखांची कसोटी
सलिल पारेख यांनी यावर्षीच जानेवारी महिन्यात इन्फोसिसच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्यावर भूतकाळात घडलेल्या कंपनीच्या संस्थापक आणि संचालक यांच्यात कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मुद्दयावरून झालेल्या वादंगाला बाजूला सारत कंपनीची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी आहे.

Web Title: Infosys Eyes Acquisitions, Charts A Three-Year Roadmap To Accelerate Growth