इन्फोसिसला रु. 3,603 कोटींचा नफा; लाभांश रु.14.75

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर सध्या(10 वाजून 8 मिनिटे) 949.30 रुपयांवर व्यवहार करत असून 2.01 टक्क्यांनी घसरला आहे.

मुंबई: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिसला सरलेल्या तिमाहीत 3,603 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामध्ये 2.8 टक्क्यांची घसरण झाली असून अगोदरच्या तिमाहीत कंपनीला 3,708 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सरलेल्या तिमाहीत कंपनीला 17,120 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या काळात कंपनीच्या डॉलरमधील उत्पन्नाचे प्रमाण 2,569 दशलक्ष डॉलरएवढे झाले आहे.

इन्फोसिसने आपल्या भागधारकांना गेल्या आर्थिक वर्षासाठी प्रतिशेअर 14.75 रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शेअरधारकांना लाभांश किंवा शेअर बायबॅकच्या रुपाने 13,000 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित करण्याचे ठरविले आहे.

गेल्या संपुर्ण आर्थिक वर्षात कंपनीला 14,353 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामध्ये 6.40 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. याअगोदरच्या आर्थिक वर्षात कंपनीला 13489 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

अर्थविषयक बातम्यांसाठी वाचा : www.sakalmoney.com

Web Title: Infosys profit arthavishwa