इन्फोसिसच्या 'सीईओं'वर पुन्हा लेटर बॉम्ब 

Infosys SEO again targeted by employees
Infosys SEO again targeted by employees

बंगळूर : इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सलील पारेख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इन्फोसिसच्या आणखी एका कर्मचाऱ्याने पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने पारेख यांच्यावर कडक कारवाई करण्यात याबाबत व्हिसलब्लोअरने पत्र दिले आहे. 

कंपनीच्या कर्मचाऱ्याने कंपनीचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की,'पारेख यांना कंपनीमध्ये काम करून आठ वर्ष झाले आहेत. तसेच ते अजूनही मुंबईहुन काम करत आहे. कंपनीच्या नियमानुसार, कंपनीच्या 'सीईओ'ने कंपनीच्या मुख्यालयातून म्हणजेच बंगळूरहुन काम करणे आवश्यक आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना बंगळूर काम करण्यास का सांगितले नाही? असा सवाल देखील संचालक मंडळाला विचारण्यात आला आहे. याआधी देखील  कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या गटाने आर्थिक ताळेबंदात गैरव्यवहाराचा आरोप केला होता. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्यांनी पत्रात केला होता. 

आता पुन्हा तक्रार केलेल्या कर्मचाऱ्याने स्वतःचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र कंपनीच्या वित्त विभागात काम करत असल्याचे सांगितले आहे.  कर्मचाऱ्याने पत्रात लिहिले आहे, मी कंपनीच्या वित्त विभागात काम करतो. प्रकरण खूपच गंभीर आणि संवेदनशील असल्याने मी माझे नाव जाहीर करू शकत नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. तसेच कंपनीचा कर्मचारी आणि समभागधारक या नात्याने ही  बाब मला अध्यक्षांच्या लक्षात आणून देणे गरजेचे वाटते.''

समभागधारकांचा कंपनीवरील विश्वास जपत यावर सकारात्मक पाऊले उचलण्यात येतील अशी आशा कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे. पारेख यांना दोन महिन्यांची मुदत देऊन देखील ते बंगळूरवरून कंपनीचे काम बघत नाही. तसेच ते दर महिन्यात दोनदा बंगळूर कार्यालयात येतात. दर महिन्यात चार 'बिझनेस क्लास'चे विमान प्रवासाचे तिकीट आणि घरापासून विमानतळावर आणि विमानतळावरून बंगळूरच्या कार्यालयात येण्यासाठी कंपनी २२ लाख रुपयांचा खर्च करते, असा आरोप देखील करण्यात आला आहे. यावर अजूनही कंपनीकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com