इन्फोसिसचा शेअर गडगडला, गुंतवणूकदारांनी गमावले 45,000 कोटी!

वृत्तसंस्था
Tuesday, 22 October 2019

मुंबई: शेअर बाजारात आज इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी आज एका सत्रात 45,000 कोटी रुपये गमावले आहेत. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलंजन रॉय हे दोघेही कंपनीचे कामकाज अनैतिक पद्धतीने चालवत असल्याचा आरोप आणि तक्रार इन्फोसिसच्याच काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या संचालक मंडळाकडे केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज राष्ट्रीय शेअर बाजारात इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठीच घसरण झाली आहे. 

राष्ट्रीय शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर आज जवळपास 17 टक्क्यांनी घसरला होता. दिवसअखेर इन्फोसिसचा शेअर 16.65 टक्क्यांनी घसरून 640.00 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. शेअरमध्ये मोठीच घसरण झाल्यामुळे शुक्रवारी 3,26,939 कोटी रुपये असलेले कंपनीचे बाजार भांडवल आज 2,81,883 कोटी रुपयांवर पोचले आहे. इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी आज दिवसभरात 45,056 कोटी रुपये गमावले आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys shares nosedive nearly 17 pct