‘इन्फोसिस’च्या शेअरवर दबाव कायम

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई: शुक्रवारी तिमाही निकालांच्या घोषणेनंतर इन्फोसिसच्या शेअरवर आजदेखील(सोमवार) विक्रीचा दबाव कायम आहे. इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. मात्र, पतमापन संस्थांचा अजूनही कंपनीच्या शेअरवर विश्वास असल्याचे दिसून येत आहे.

रेलिगेअरने शेअरसाठी 'बाय' मानांकन कायम ठेवले आहे. याशिवाय, जेफरीज आणि मॉर्गन स्टॅन्ले या संस्थांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीजने शेअरची टार्गेट प्राइस 1280 रुपयांवरुन 1220 रुपये केली आहे. मॉर्गन स्टॅन्लेने इन्फोसिसच्या शेअरसाठी 1130 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर आज(सोमवार) 965 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 952.50 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 965 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(12 वाजून 10 मिनिटे) कंपनीचा शेअर 1.47 टक्के घसरणीसह 960.80 रुपयांवर व्यवहार करत आहे.

Web Title: Infosys shares remain under pressure

टॅग्स