पायाभूत सुविधा क्षेत्राचा  सहा महिन्यांतील उच्चांक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : पायाभूत सुविधा क्षेत्राची वाढ ऑक्‍टोबर महिन्यात 6.6 टक्के झाली असून, हा मागील सहा महिन्यांतील उच्चांक आहे. पोलाद आणि तेल शुद्धिकरण उत्पादनांची चांगली कामगिरी याला कारणीभूत ठरली आहे. 

नवी दिल्ली : पायाभूत सुविधा क्षेत्राची वाढ ऑक्‍टोबर महिन्यात 6.6 टक्के झाली असून, हा मागील सहा महिन्यांतील उच्चांक आहे. पोलाद आणि तेल शुद्धिकरण उत्पादनांची चांगली कामगिरी याला कारणीभूत ठरली आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात ऊर्जा निर्मिती, खत निर्मिती आणि सिमेंट उत्पादनात लक्षणीय घसरण झाली आहे. कोळसा उत्पादनात सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे. पायाभूत सुविधांमधील कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धिकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये 3.8 टक्के होती. या वर्षी सप्टेंबर महिन्यात ती 5 टक्के होती. औद्योगिक उत्पादनात एप्रिल ते ऑक्‍टोबर या कालावधीत 4.9 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी याच काळात ती 2.8 टक्के होती. ऑक्‍टोबरमध्ये पोलाद उत्पादनात 16.9 टक्के तर तेलशुद्धिकरण उत्पादनात 15.1 टक्के वाढ झाली आहे. 

Web Title: Infra sector growth jumps to 6-month high of 6.6 pc in Oct