लाभांश वितरणामुळे ओएनजीसीच्या नफ्याला फटका

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ओएनजीसी) नफ्यावर लाभांश वितरणामुळे (रॉयल्टी पेमेंट) परिणाम होणार आहे. कंपनीला दोन राज्यांना लाभांशाचे वितरण करावयाचे असल्याने निव्वळ नफ्याला रु.1600 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ओएनजीसीने यापूर्वीच रु.2500 कोटींचे लाभांश वितरण केले आहे. ओएनजीसी आणि ऑइल इंडिया लि.सारख्या सरकारी मालकीच्या कंपन्यांकडून कमी लाभांश देण्यात आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला गुजरात आणि आसाम या राज्यांना रु.15000 कोटी लाभांश देण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या मुंबई शेअर बाजारात ओएनजीसीचा शेअर 196.65 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ वाढ झाली आहे. पाच रुपये दर्शनी किंमत असलेल्या शेअरने वर्षभरात 125.40 रुपयांची नीचांकी तर 212 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.252,429.74 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Integrated oil company in the works: ONGC may merge HPCL or BPCL with itself