"वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"ची मुंबईत आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर होणार चर्चा

मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही परिषद होणार आहे. 

या तीन दिवसांच्या परिषदेत 14 सत्रे असतील आणि 37 देशांतील 354 परदेशी प्रतिनिधी आणि 650 भारतीय प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. यामध्ये उद्योगक्षेत्रातील दिग्गज आणि धोरणकर्ते चर्चा करतील. "डब्ल्यूएचईएफ"च्या 7 व्या आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषदेचा विषय 'प्रॉस्परस सोसायटी: स्ट्रॉंगर सोसायटी' असा आहे. 

या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, भाजप खासदार सुब्रमणियन स्वामी, पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार, यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

'डब्ल्यूएचईएफ"मुळे व्यवसायांना परस्परांशी जोडून घेण्याची तसेच संवाद दृढ करण्याची संधी मिळते. आपण केवळ यशस्वी व उद्यमशील व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातूनच तंत्रज्ञान, भारतातील तरुणांना व हाताशी असलेली संसाधने यांतील सुप्त आर्थिक संभाव्यता प्रत्यक्षात आणू शकतो, असे मत 'डब्ल्यूएचईएफ"चे आरंभकर्ते स्वामी विज्ञानानंद यांनी व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Annual Conference in Mumbai of "World Hindu Economic Forum"