क्‍लीअर फंड्‌सची म्युच्युअल विनामोबदला गुंतवणूक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 मे 2018

मुंबई- क्‍लीअर फंड्‌सने प्रीमियम स्मार्ट पोर्टफोलिओ सेवा सुरू केली असून, गुंतवणूकदारांना थेट म्युच्युअल फंडात कोणतेही कमिशन न देता गुंतवणूक करता येणार आहे. कागदपत्रांच्या क्‍लिष्ट प्रक्रियेविना गुंतवणूकदारांना ऑनलाईन पद्धतीने पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत अकाऊंटची नोंदणीची सुविधा पोर्टलवर सुरू केली आहे. थेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने क्‍लीअर फंड्‌सच्या गुंतवणूकदारांना वर्षाकाठी एक टक्‍क्‍यापर्यंतचे छुपे कमिशनची बचत करता येणार आहे. 

गुंतवणूकदारांसाठी ऑनलाईन कार्यप्रणाली स्वयंचलित बनवण्यासाठी तंत्रज्ञान वापरावर कंपनीने मेहनत घेतली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून थेट म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांसाठी नि:शुल्क सेवा देणे शक्‍य झाल्याचे क्‍लीअरफंड्‌सडॉटकॉमचे संस्थापक आणि सीईओ कुणाल बजाज यांनी सांगितले. गुंतवणुकीची संधी ही प्रत्येकासाठी संपत्ती किंवा उत्पन्नाचा विचार न करता सहज सोप्या प्रकारे उपलब्ध असावी, असे कंपनीचे मत आहे. क्‍लीयर फंड्‌स स्मार्ट पोर्टफोलियोज ही प्रत्येकासाठी गुंतवणूक प्रक्रिया सुलभ बनवण्यासाठी विकसित केलेली स्वयंचलित मार्गदर्शन सेवा असल्याची माहिती त्यांनी दिली. क्‍लीयर फंड्‌सकडून अल्गोरिदमवर आधारित तंत्रज्ञान वापरून कर्ज खात्यांचा (डेट) समतोल राखत इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओज बनवले जातात. जे गुंतवणूकदारांसाठी वेळेची बचत करणारे, कमी जोखमीचे आणि अपेक्षित लाभ मिळवून देणारे ठरतात, असा दावा त्यांनी केला. 

Web Title: Invest in Mutual Funds for Clear Funds