‘इमर्जिंग थीम्स फॉर वेल्थ क्रिएशन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ अर्थात ‘पीएमएस’अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ‘सकाळ मनी’ने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या सहकार्याने ‘इमर्जिंग थीम्स फॉर वेल्थ क्रिएशन’ या उद्‌बोधनपर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

येत्या शुक्रवारी (१७ मे) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हॉटेल ‘शेरेटन ग्रॅंड’ (बंडगार्डन रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार असून, तो प्रामुख्याने ‘पीएमएस’अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी योग्य ठरणारा असेल. ‘पीएमएस’अंतर्गत किमान २५ लाख रुपयांची गुंतवणूक करणे अपेक्षित असते. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे फंड मॅनेजर (पीएमएस इक्विटी) पराग ठक्कर हे नामांकित गुंतवणूकतज्ज्ञ या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. ठक्कर यांना या क्षेत्रातील १४ हून अधिक वर्षांचा अनुभव असून, या कार्यक्रमात त्यांचे वैयक्तिक स्वरूपात मार्गदर्शन मिळण्याचीही संधी प्राप्त होणार आहे.

या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ७४४७४५२३४० या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.

‘पीएमएस’ कार्यक्रमाचे तपशील
वार व तारीख - शुक्रवार, १७ मे १९
वेळ - सायंकाळी ७ ते ९
स्थळ - हॉटेल शेरेटन ग्रॅंड, पुणे
मार्गदर्शक - पराग ठक्कर, फंड मॅनेजर (पीएमएस इक्विटी)आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investment Emergency Themes for Wealth Creation Parag Thakkar