Options Trading : ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे काय? असा कमवा बक्कळ नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trading

Options Trading : ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे काय? असा कमवा बक्कळ नफा

Options Trading : भारतीय बाजाराच्या दैनंदिन व्यापारात डेरिव्हेटिव्हचे योगदान 97% पेक्षा जास्त आहे. गुंतवणूकदारांमध्ये बाजारपेठेतील जागरूकता वाढल्याने ऑप्शन ट्रेडिंग सारख्या डेरिव्हेटिव्हमध्ये किरकोळ सहभाग वाढला आहे. आज आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? आणि यातून कशाप्रकारे जास्तीत जास्त नफा कसा कमावला जाऊ शकतो याबाबत जाणून घेणार आहोत. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जास्त जोखीम असते. (What Is Options Trading)

हेही वाचा: Post office scheme : पोस्ट ऑफीसच्या या योजनेत पंतप्रधानही करतात गुंतवणूक

ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे काय?

ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार स्टॉकच्या किमतीत संभाव्य घसरण किंवा वाढीवर बेट लावतात. तुम्ही कॉल आणि पुश पर्याय ऐकले असतील. ज्या गुंतवणूकदारांना स्टॉकमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असते, ते कॉल ऑप्शन विकत घेतात आणि ज्या गुंतवणूकदारांना घसरणीचा कल दिसत असतो ते पुश ऑप्शन्समध्ये पैसे गुंतवतात. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये येण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टींशी परिचित असणे आवश्यक आहे.

ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी या गोष्टी महत्त्वाच्या

पैशाची आवश्यकता : ऑप्शंसची शेल्फ लाइफ खूपच कमी असते म्हणजे साधारण एक महिना वगैरे. त्यामुळे यामध्ये पैसे गुंतवताना पूर्ण रक्कम वापरू नये. त्याऐवजी एखाद्या विशिष्ट व्यवसायासाठी एकूण भांडवलाच्या सुमारे 5-10 % पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते.

ऑप्शन ट्रेड्सचे मूल्यमापन करा : सामान्य नियमानुसार गुंतवणूकदाराने ते किती जोखीम पत्करण्यास तयार आहेत याचा अंदाज बांधावा. गुंतवणुकीपूर्वी अपसाइड एक्झिट पॉइंट आणि डाउनसाइड एक्झिट पॉइंटची निवड करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने ट्रेडिंग पॅटर्नचे नियोजन करण्यास मदत होते.

हेही वाचा: या' 3 स्टॉक्सबाबत शेअर मार्केट तज्ञांना विश्वास; तुमच्याकडे आहेत का?

माहिती घ्या : ऑप्शन ट्रेडिंग करण्यापूर्वी या संबंधित ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे ऑप्शन्स ट्रेडिंगमधून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यात मदत होईल.

इलिक्विड स्टॉकमध्ये ट्रेडिंग टाळा : लिक्विडिटी खूप महत्वाची आहे कारण यामुळे ट्रेडमध्ये अधिक सहजपणे पुढे जाण्यास आणि रिक्स फॅक्टरपासून बचाव करते. बहुतांश लिक्विड स्टॉक सामान्यतः अधिक किमतीचे असतात. त्यामुळे शक्य असल्यास इलिक्विड स्टॉकमध्ये ट्रेडिंग टाळणे फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा: जाणून घ्या,काय आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामधला फरक

ऑप्शन ट्रेडिंग करताना काय काळजी घ्याल

केवळ स्वस्त आहे म्हणून डीप-आउट-ऑफ-द-मनी (OTM) पर्याय खरेदी करू नका. नियमित अंतराने नफा बुक करत रहा किंवा नफ्याचा ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवा. योग्य पद्धतीने सराव केल्यास ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये अनेक पटींनी परतावा मिळू शकतो.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)