म्युच्युअल फंडांत मागील वर्षी 3.43 लाख कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

त्याआधीच्या वर्षात म्हणजेच 2015-16 या कालावधीत म्युच्युअल फंडात 1 लाख 34 हजार 180 कोटींची गुंतवणूक झाली होती.

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांनी मागील आर्थिक वर्षात विविध म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी 3.43 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

"असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया'ने (ऍम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे मार्च 2017 अखेर म्युच्युअल फंडात 3 लाख 43 हजार 49 कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्याआधीच्या वर्षात म्हणजेच 2015-16 या कालावधीत म्युच्युअल फंडात 1 लाख 34 हजार 180 कोटींची गुंतवणूक झाली होती.

1999-2000 नंतर प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यात आली. म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्तादेखील नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 18.3 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोचली आहे. बॅंकांच्या ठेवींवर मिळणारे कमी व्याज आणि फंडांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा ओढा वाढल्याने यंदा लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

Web Title: Investments in Mutual Funds are growing