जिओमध्ये गुंतवणुकीचा धडाका सुरुच; परदेशी कंपन्यांकडून १ लाख कोटींवर गुंतवणूक!

वृत्तसंस्था
Thursday, 18 June 2020

जिओ इन्फोकॉम ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी आहे. कंपनीने  2016 च्या अखेरीस सुरू झालेल्या प्रवासापासून आतापर्यंतची ग्राहकसंख्या 38 कोटी 80 लाखांवर पोचली आहे.

मुंबई : रिलायन्स जिओमध्ये गुंतवणुकीचा धडाका सुरू असून गुरुवारी (ता.18) पीआयएफने 11,367 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. जिओमध्ये दोन महिन्यांच्या काळात 11 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. 

गुरुवारी पीआयएफने 2.32 टक्के हिस्सेदारी विकत घेण्याची घोषणा केली. आता परदेशी कंपन्यांची जिओमधील हिस्सेदारी 24.70 टक्क्यांवर जाणार आहे. 

- दागिन्यांच्या निर्यातीत ९० टक्‍क्‍यांहून अधिक घट

सौदी अरेबियाच्या 'वेल्थ फंड' पीआयएफने आतापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वात मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक पीआयएफ धोरण आणि त्यांच्या व्हिजन 2030 अंतर्गत गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांच्या गुंतवणुकीशी सुसंगत आहे.

गेल्या 58 दिवसांच्या आत रिलायन्स जिओमध्ये एकूण 1,15,693 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

- रुपी बॅंकेला 19 कोटींचा नफा

कोणी किती केली गुंतवणूक?

- फेसबुक : 43 हजार 574 कोटी रुपये (22 एप्रिल)

- 9.99 टक्के

- सिल्व्हर लेक : 5 हजार 655 कोटी रुपये (3 मे) आणि 4 हजार 546.89 कोटी रुपये (5 जून)
 - 2.08 टक्के

- व्हिस्टा : 11 हजार 367 कोटी रुपये (8 मे)
- 2.32 टक्के

- जनरल अटलांटिक : 6 हजार 598 कोटी रुपये (17 मे)
 - 1.34 टक्के

- केकेआर : 11 हजार 367 कोटी रुपये (22 मे)
-  2.32 टक्के

- मुबादला : 9 हजार 93 कोटी रुपये (5 जून)
- 1.85 टक्के

- अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी : 5 हजार 683 कोटी रुपये (7 जून)
- 1.16 टक्के

पीआयएफ : 11 हजार 367 कोटी रुपये (18 जून)
- 2.32 टक्के

जिओ इन्फोकॉम ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी आहे. कंपनीने  2016 च्या अखेरीस सुरू झालेल्या प्रवासापासून आतापर्यंतची ग्राहकसंख्या 38 कोटी 80 लाखांवर पोचली आहे.

- धक्कादायक : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला अडचणीत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, “आम्ही अनेक दशकांपासून सौदी अरेबियाबरोबरचे चांगल्या आणि फलदायी संबंधांचा आनंद लुटत आहोत. पीआयएफच्या जिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणूकीवरून हे स्पष्ट झाले आहे की हे नाते, तेलाच्या अर्थव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन आता भारताची नवीन तेल-डेटा अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investments into Reliance Jio cross one lakh crore in under 2 months