आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएलकडून लाभांश जाहीर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल(आयओसी), भारत पेट्रोलियम(बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम(एचपीसीएल) या तेल कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी(2016-17) अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या तिन्ही कंपन्यांकडून एकत्रितपणे 4,570 कोटी रुपयांचा लाभांश दिला जाणार असून त्यापैकी सरकारी तिजोरीत 2,558 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे.

इंडियन ऑईलच्या संचालक मंडळाने प्रतिशेअर साडेचार रुपये अर्थात 45 टक्के लाभांश जारी केला आहे. लाभांशवाटपासाठी पात्र भागधारक निवडण्यासाठी 27 मार्च ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, एचपीसीएलने प्रतिशेअर 6.40 रुपये तर बीपीसीएलने 12 रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. एचपीसीएलने 31 मार्च किंवा त्यापुर्वी लाभांश दिला जाईल असे सांगितले असून बीपीसीएलने लाभांश देण्यासाठी 27 मार्च रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

चांगला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी दरवर्षी चांगला लाभांश द्यावा अशी मागणी सरकारने केली होती. विशेषतः नफ्यात व्यवहार करणाऱ्या सार्वजनिक तेल कंपन्यांवर सरकारने विशेष दबाव निर्माण केला होता. लाभांशाच्या घोषणेनंतर तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्याहून अधिक घसरणीसह व्यवहार सुरु आहे.

Web Title: IOC, BPCL, HPCL declare interim dividends for 2016-17