आयपीएलच्या मॅचेससाठी तब्बल 2500 कोटी रुपयांचा विमा

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

भारतात होणार्‍या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या मॅचेससाठी तब्बल 2500 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.

नवी दिल्ली: भारतात होणार्‍या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या मॅचेससाठी तब्बल 2500 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. ट्वेंटी-20 क्रिकेट लीग 7 एप्रिल, 2018 ते 27 मे 2018 दरम्यान खेळली जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणार्‍या स्पर्धेची जोखीम मोठी असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत विम्याची रक्कम वाढवण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियमच्या सरासरी सरासरी 3.5 ते 4 पट वाढली आहे. शिवाय खेळाडूंसाठी, प्रत्येक संघाला जवळजवळ 40 कोटी रुपये देण्यात आले आहेत. आयपीएलसाठी ब्रॉडकास्टरसाठी म्हणजेच प्रसारणाच्या 1500 कोटी रुपयांचा देखील यात समावेश आहे. तसेच कार्यक्रम आणि तिकिटे रद्द झाल्यास त्याच्या भरपाईची देखील या विम्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. विमा क्षेत्रात अशा प्रकारचा विमा देण्यासाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी आघाडीवर आहे. 

आयपीएलचा संपूर्ण खेळ रद्द झाल्यास 1,500 कोटी रुपयांच्या विम्याच्या समावेशासह एखाद्या सामन्यास विलंब झाल्यास त्यांच्या भरपाईची देखील तरतूद यात आहे.

Web Title: IPL 2018 takes mega insurance of Rs 2,500 crore for event