शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी (व्हिडिओ)

शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी (व्हिडिओ)

मुंबई: शेअर बाजारात सध्या दोन आयपीओसाठी अर्ज करता येणार आहेत. 

कसे आहेत रेल विकास निगम लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे आयपीओ: याबाबत सांगत आहेत तज्ज्ञ नंदिनी वैद्य 

रेल विकास निगम लिमिटेड: 
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांना आणि पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिशेअर 0.50 पैशांची सवलत देण्यात येणार आहे. रेल विकास निगम ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून रेल्वे मंत्रालयच्या अंतर्गत काम करते. 

आयपीओच्या माध्यमातून 25 कोटी 34 लाख 57 हजार 280 शेअरची विक्री करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान 780 शेअरसाठी आणि त्यानंतर 780 च्या पटीत अर्ज करणे आवश्यक आहे.  

मेट्रोपोलिस हेल्थकेअर: 
मेट्रोपोलिस हेल्थकेअर डायग्नॉस्टिकस क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या 3 एप्रिलपासून सुरु होणार आहे. आयपीओसाठी 5 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 877 ते 880 रुपयांच्या किंमतपट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना किमान 17 शेअरसाठी आणि त्यानंतर 17 च्या पटीत अर्ज करणे बंधनकारक आहे. आयपीओच्या माध्यमातून 1,204 कोटी रुपये उभा करण्याचा कंपनीचा मानस आहे. 

आयपीओच्या माध्यमातून 1 कोटी 36 लाख 85 हजार 95 शेअरची विक्री करण्यात येणार आहे. यापैकी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 3 लाख शेअर राखीव ठेण्यात आले आहेत. 

जेएम फिनान्शिअल लिमिटेड, क्रेडिट स्युइस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅश (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड व कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे आयपीओ ऑफरचे व्यवस्थापन करणार आहेत. 

आयपीओ म्हणजे काय?
व्यवसाय विस्ताराकरता कर्जे न घेता पैशांची उभारणी करण्यासाठी कंपन्या आपला आयपीओ म्हणजेच प्राथमिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) बाजारात आणत असतात. आयपीओच्या माध्यमातून कंपन्या संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी देतात. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com