कर्जवसुलीसाठी रिकव्हरी एजंटकडून चाललेला तुमचा छळ कायदेशीर आहे का ?

तुम्ही आरबीआयकडे तक्रार करू शकता. आरबीआय बँकेला निर्देश देईल. प्रसंगी आरबीआय बँकेला दंडही ठोठावू शकते.
recovery agent
recovery agentgoogle

मुंबई : आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रिकव्हरी एजंटचा वापर करणे किंवा तसे करण्याची धमकी देणे हे कायदेशीर नाही. अशाप्रकारे रिकव्हरी एजंट त्रास देत असल्यास काय करावे हे जाणून घेऊ या....

recovery agent
आंतरराष्ट्रीय योग दिन : ही योगासने करतील मासिक पाळीच्या समस्या दूर

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रिकव्हरी एजंट शारीरिक आणि मानसिक प्रकारचा त्रास देऊ शकत नाहीत. सकाळी ९ वाजण्याच्या आधी आणि संध्याकाळी ६ नंतर कॉल करणे म्हणजेही त्रास देणेच मानले जाते. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन त्याच्या सहकाऱ्यांना किंवा नातेवाईकांना धमकावणेही कायदेशीर नाही.

recovery agent
परदेशात इंटर्नशिप कशी मिळवाल ? काय आहेत फायदे ?

रिकव्हरी एजंट त्रास देत असेल तर सर्वात आधी बँकेकडे तक्रार करा. आपली परिस्थिती समजावून सांगा. ३० दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण झाले नाही तर तुम्ही आरबीआयकडे तक्रार करू शकता. आरबीआय बँकेला निर्देश देईल. प्रसंगी आरबीआय बँकेला दंडही ठोठावू शकते.

मारहाण किंवा घरातील एखादी वस्तू उचलून घेऊन जाणे अशी बेकायदेशीर कृत्ये रिकव्हरी एजंटने केल्यास संबंधित व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करू शकते. एखाद्या वकीलाशीही तुम्ही संपर्क साधू शकता. एजंटने केलेल्या कृत्यांच्या आधारे न्यायालयात किंवा ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला जाऊ शकतो.

रिकव्हरी एजंट लोकांसोबत गैरवर्तन करतात ही गोष्ट कदापि स्वीकारार्ह नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी सांगितले आहे. FE Modern BFSI Summitमध्ये त्यांनी सांगितले की, अशा गोष्टी बऱ्याचदा अनियंत्रित वित्त पुरवठा कंपन्या करतात. काही वेळा नियंत्रित कंपन्यांबाबतही अशा तक्रारी येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com