माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधीत मंदी

IT_Employment_
IT_Employment_

मुंबई : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मंदीचा परिणाम आता नोकरभरतीवरदेखील दिसू लागला आहे. देशातील चार दिग्गज आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरभरतीत कपात केली आहे. सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, आयटी कंपन्यांतून 43 टक्के नोकरकपात झाली आहे. या चारही कंपन्यांचे मनुष्यबळ कमी होऊन 14,421 एवढे झाले आहे.

सध्या सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात मंदीचे वारे आहेत. कोटक इंस्टिट्यूशनल इक्विटीजने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 24 टक्के नोकरकपात झाली आहे. सरलेल्या तिमाहीत आयटी कंपन्यांचे निकाल निराशाजनक आले आहेत. परिणामी कंपनीच्या उत्पन्नावर देखील त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. वर्षभरात आयटी क्षेत्रातील वाढ अतिशय मंद गतीने सुरू आहे. मात्र आता आर्थिक क्षेत्राकडून सॉफ्टवेअरची मागणी वाढण्याची आशा आहे. अशातच् काही आयटी क्षेत्राबाहेरील कंपन्या स्वतःच सॉफ्टवेअर विकसित करत आहे. याचा मोठा फटका आयटी कंपन्यांना बसतो आहे.

आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भारतीय आयटी उद्योगाला परदेशातून मोठा रोजगार उपलब्ध होतो. विशेषत: अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशातून मोठे कंत्राट मिळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com