‘आयटी’च्या 2 लाख नोकर्‍या संकटात; पण…

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

मुंबई: माहिती तंत्रज्ञान(आयटी) क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येत असली तरीही नवी कौशल्ये शिकून घेतल्यास सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा रोजगार मिळणे शक्य आहे, असा आशावाद एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई: माहिती तंत्रज्ञान(आयटी) क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येत असली तरीही नवी कौशल्ये शिकून घेतल्यास सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा रोजगार मिळणे शक्य आहे, असा आशावाद एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

सिआयईएल एचआर सर्व्हिसेस या संस्थेने 50 आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. यावरुन असे लक्षात आले आहे की सध्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, टेस्टिंग अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विभागातील नोकऱ्या धोक्यात आहेत. मात्र, क्लाऊड कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी फ्रेशर्स आणि आठ वर्षांपेक्षा कमी अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह आयटी क्षेत्रातील 50 टक्के मनुष्यबळास पुन्हा एकदा नवी कौशल्ये शिकवण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे. परंतु उर्वरित 50 टक्के मनुष्यबळाला मात्र बँकिंग किंवा रिटेल या क्षेत्रांचा पर्याय निवडता येईल असेही यात नमूद करण्यात आले आहे.

"सध्या आयटी क्षेत्रात कर्मचारी कपातीचे प्रमाण 15 ते 20 टक्के आहे. त्या जागी नवे तंत्रज्ञान येत नसून स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. यामुळे येत्या दोन वर्षासुमारे दोन लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. हे सगळं ऐकायला निराशाजनक आहे. परंतु सगळंच काही संपलेलं नाही. अजूनही अनेक संधींचा लाभ घेतला जाऊ शकतो", असे सिआयईएल एचआर सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य नारायण मिश्रा म्हणाले.

सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या 33 टक्के कर्मचाऱ्यांनी स्वयंचलित तंत्रज्ञान व सरकारच्या बदलणाऱ्या धोरणांमुळे ही कपात होत आहे असे मत व्यक्त केले. आणखी 44 टक्क्यांनी ही कपात कर्मचाऱ्यांच्या कमकुवत कामगिरीमुळे हो असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे, नोकरकपातीविषयी सुरु असलेल्या चर्चेमुळे त्याविषयीची भीती वाढत असल्याचेही 56 लोकांनी सांगितले.

Web Title: IT jobs in IT crisis; But ...