टाटांच्या जॅग्वारची चीनी बँकांकडून 70.5 कोटी डॉलरच्या कर्जाची उभारणी

वृत्तसंस्था
Friday, 5 June 2020

चीनमधील बँकांमध्ये बँक ऑफ चायना, चायना कन्स्ट्रक्शन बँक, बँक ऑफ कम्युनिकेशन्स अँड शांघाय पुडॉग डेव्हलपमेंट बँक यांचा समावेश आहे. 
कोविड-19 महामारीमुळे जगभरातील वाहन उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. 

जॅग्वार लँड रोवर (जेएलआर) या टाटा मोटर्सच्या मालकीच्या ब्रँडने चीनमधील बँकांकडून कर्जाची उभारणी केली आहे. जेएलआरने चीनी बँकांशी 70.45 कोटी डॉलरच्या कर्जासंदर्भात करार केला आहे. चीनमधील बँकांकडून जेएलआरने पहिल्यांदाच कर्ज घेतले आहे. जेएलआरला देण्यात येणारे कर्ज हे तीन वर्षांसाठीचे रिव्हॉल्व्हिंग स्वरुपाचे कर्ज असणार आहे, अशी माहिती जॅग्वार लँड रोवरचे उपाध्यक्ष आणि चीनमधील मुख्य वित्तीय अधिकारी आर्थर यु यांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधील बँकांमध्ये बँक ऑफ चायना, चायना कन्स्ट्रक्शन बँक, बँक ऑफ कम्युनिकेशन्स अँड शांघाय पुडॉग डेव्हलपमेंट बँक यांचा समावेश आहे. 
कोविड-19 महामारीमुळे जगभरातील वाहन उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. आधीच मंदीला सामोरा जात असलेला वाहन उद्योग कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. वाहन उद्योगांच्या पुरवठा साखळीवर आणि विक्री व्यवस्थेलाही कोरोनाचा मोठा दणका बसला आहे. या पार्श्वभूमीवर जेएलआरने या कर्जाची उभारणी केली आहे.

हेही वाचा  :  आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या​

जेएलआरच्या एकूण जागतिक विक्रीत चीनमधील विक्रीचा वाटा 25 ते 30 टक्के इतका असायचा. मात्र मागील दोन महिन्यात तो 50 टक्क्यांवर गेला आहे. या कर्जामुळे जेएलआरला चीनमध्ये आपले कामकाज आणखी कार्यक्षमपणे करण्यास आणि पुरेशा रोकडची उपलब्धता करता येणार आहे, असे मत आर्थर यु यांनी व्यक्त केले आहे.

जेएलआर चीनमधील बाजारपेठेत आपल्या कारची विक्री करण्यासाठी कारची चीनमध्ये आयात करते, याशिवाय पूर्व चीनमधील चांगशू शहरात कंपनीचा भागीदारीतील उत्पादन प्रकल्पदेखील आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातील जेएलआरची विक्री ही मागील वर्षीच्या एप्रिलइतकीच होती. मात्र मे महिन्यात जेएलआरच्या चीनमधील विक्रीत वाढ झाली आहे. चीनमधील आलीशान कारच्या श्रेणीतील वाहनांचा खप मागील वर्षाइतकाच किंवा त्यात किंचित वाढ होण्याची अपेक्षा जॅग्वार लँड रोवरला असल्याची माहिती यु यांनी दिली आहे.

हेही वाचा  : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaguar land rover raises loan of 70.5 crore dollar from chinese banks