जावाची 'पेरॅक' बॉबर भारतात लाँच, फोटो पाहाच!

टीम ई-सकाळ
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

पेरॅक ही दिसायला बुलेटशी मिळतीजुळती असली तरी तिच्या लूकमध्ये बराच फरक आहे.

सर्वात जास्त दुचाकी वापरला जाणारा देश अशी भारताची ओळख आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राची उलाढालही भारतात मोठ्या प्रमाणावर होते. गाड्यांना असणारी मागणी लक्षात घेता जगभरातील टू-व्हिलर आणि फोर-व्हिलर उत्पादित कंपन्या भारतातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गाड्यांचे मॉडेल लाँच करत असतात.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नव्वदीच्या दशकात तुफान फॉर्मात असलेल्या जावा कंपनीने बॉबर फॉरमॅटमधील 'पेरॅक' बाईक शनिवारी (ता.16) भारतात लाँच केली. यामुळे बुलेटच्या 'थंडरबर्ड' आणि हार्ले डेव्हिडसन या गाड्यांमध्ये जोरदार स्पर्धा यामुळे निर्माण झाली आहे.

जावा कंपनीने या अगोदर जावा क्लासिक आणि जावा 42 या बाईक लाँच केल्या होत्या. पेरॅक ही भारतात लाँच करण्यात आलेली तिसरी बाईक ठरली आहे. 1.95 लाख रुपये एक्स शोरुम किंमत असलेली पेरॅक आज लाँच झाली. या आधी पेरॅकची एक्स शोरुम किंमत 1.89 लाख रुपये होती, मात्र, बीएस-6 इंजिन प्रणालीमुळे गाडीच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

- बिल गेट्‌स पुन्हा जगातील सर्वांत धनवान; कोणाला टाकले मागे?

Image may contain: motorcycle and outdoor

अॅट्रॅक्टिव्ह लूक

पेरॅक ही दिसायला बुलेटशी मिळतीजुळती असली तरी तिच्या लूकमध्ये बराच फरक आहे. आणि जावाची आतापर्यंतची सर्वात वेगळी बाईक ठरली आहे. पेरॅक ही बॉबर स्टाईल बाईक आहे. स्विंगआर्म आणि मोनो सस्पेंशन गाडीमध्ये दिसत आहे. 

- भारत सरकार नळाद्वारे पाण्यासाठी इस्राईलची घेणार मदत

Image may contain: motorcycle

जावाच्या क्लासिक आणि 42 या गाड्यांमध्ये जिथे ड्रम ब्रेक सेटअप होता, त्याठिकाणी पेरॅकमध्ये डुअल चॅनल एबीएससह बसविण्यात आले आहे. तसेच गाडीच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरॅक ही सिंगल सीट बाईक आहे.

- 'मिर्झापूर 2' च्या निमित्ताने कालिन भय्याचं इन्स्टाग्रामवर कमबॅक !

Image may contain: 1 person, motorcycle

इंजिन

पेरॅक बाईकमध्ये 334 cc लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे. यामुळे 30.4 bhp पॉवर आणि 31Nm टॉर्क निर्माण होतो. याच वैशिष्ट्यामुळे पेरॅक ही क्लासिक आणि 42 ला भारी पडते. तसेच 6 स्पीड गिअर बॉक्स या बाईकला आहे. 

जावा कंपनीने आतापर्यंत देशातील प्रमुख 85 शहरांमध्ये शंभर डिलरशिपची उभारणी केली आहे. पेरॅक लाँचिंग कार्यक्रमास महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jawa Perak launched in India with BS6 compliant engine