नोटाबंदीमुळे लग्नसराईतही सराफी दुकाने ओस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

मुंबई : केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर त्याचा आता सराफा बाजारावर परिणाम दिसू लागला आहे. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम असून देखील सराफा बाजार ओस पडले आहेत.

दरवर्षी एकट्या मुंबईमध्ये सरासरी दर महिन्याला मे-जून पर्यंत 15,000 विवाहसोहळे पार पडत असतात. त्यामुळे पैशांची मोठी उलाढाल होते. दरवर्षी हंगामाच्या काळात 3 ते 4 टन सोन्याची म्हणजेच रु.125 कोटी रुपयांची उलाढला होते. आता मात्र ही विक्री 10 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

याशिवाय नफेखोरी आणि करचुकवेगिरीप्रकरणी देशभरात सराफी पेढ्यांवर छापे टाकल्यामुळे सराफांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा लहान सराफां अधिक फटका बसला आहे. राजधानी दिल्लीतील सराफांनी गेल्या 15 दिवसांपासून बंद पुकारला आहे. प्राप्तिकर विभागाने नफेखोरी आणि करचुकवेगिरीप्रकरणी देशभरात सराफी पेढ्यांवर छापे टाकल्यामुळे 11 नोव्हेंबरपासून हा बंद पुकारण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात सरकारने पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले होते. यानंतर प्राप्तिकर विभागाने 10 नोव्हेंबरला देशभरात सराफी पेढ्यांवर छापे टाकले होते. यात दिल्लीतील दरीबा कालन, चांदणी चौक आणि करोल बाग येथील सराफी पेढ्यांचाही समावेश होता. यामुळे सराफांनी 11 नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय उत्पादन शुल्क गुप्तचर महासंचालनालयाने सराफांना नोटिसा पाठविल्या असून, त्यांच्याकडे सोने विक्रीचे तपशील मागितले आहेत. तसेच, सोन्याचा साठा आणि मागील काही दिवसांत केलेली विक्री याची माहितीही सराफांकडे मागितली आहे.

Web Title: jewellery shops empty despite wedding season