दागिन्यांच्या निर्यातीत ९० टक्‍क्‍यांहून अधिक घट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

रेड झोन असलेल्या मुंबईत हिरे व दागिने निर्यात करणाऱ्या कारखान्यांना सरकारने परवानगी दिल्यावर हा व्यवसाय हळूहळू का होईना सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल व मे महिन्यांपेक्षा या वर्षी व्यवसायात ९० टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली असली, तरी वर्षभरात गती वाढण्याची उद्योजकांना अपेक्षा आहे.

मुंबई - रेड झोन असलेल्या मुंबईत हिरे व दागिने निर्यात करणाऱ्या कारखान्यांना सरकारने परवानगी दिल्यावर हा व्यवसाय हळूहळू का होईना सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल व मे महिन्यांपेक्षा या वर्षी व्यवसायात ९० टक्‍क्‍यांहून अधिक घट झाली असली, तरी वर्षभरात गती वाढण्याची उद्योजकांना अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंधेरीतील सीप्झमध्ये रत्न व आभूषणांचे किमान १५० कारखाने आहेत. तेथे फक्त निर्यातीसाठी सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने घडवले जातात. मुंबई रेड झोनमध्ये असल्याने तेथील बहुतेक कारखाने एप्रिलमध्ये बंदच होते. निर्यातीच्या ऑर्डर पूर्ण करायच्या असल्याने या व्यावसायिकांनी कारखाने उघडण्याची परवानगी मागितली. सरकारने ११ मे रोजी परवानगी दिल्यावर आधीच्या ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या व नंतर नव्या ऑर्डरवरही काम सुरू झाले.

No photo description available.

धक्कादायक : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला अडचणीत

सवलती, कर्जाची अपेक्षा
काही महिने जागतिक लॉकडाऊनमुळे हिऱ्यांच्या दागिन्यांची निर्यात घटली आहे. आखाती देश व अमेरिकेत कोरोनाचा फैलाव सुरूच असल्याने व्यवसाय थंड आहे. चीन, ऑस्ट्रेलिया व युरोपातून मात्र दागिन्यांची मागणी हळूहळू वाढू लागली आहे. भारतातही दागिने निर्यातीचा व्यवसाय सावरत असून, ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’ मोहिमेंतर्गत सवलती आणि सहजपणे कर्ज मिळाल्यास व्यवसाय उभारी धरेल, असे जेम्स अँड ज्वेलरी एक्‍सपोर्टस असोसिएशनचे पदाधिकारी सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jewelry exports down more than 90 percent