खुशखबर...! रिलायन्स करणार बंपर नोकरभरती 

खुशखबर...! रिलायन्स करणार बंपर नोकरभरती 

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गिगाफायबर नेटवर्कची मोठी घोषणा केली आहे.याचबरोबर सौदी अरॅमकोसोबत मोठी भागीदारी केल्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे रिलायन्समध्ये आता मोठ्या प्रमाणावर नोकरभरती देखील केली जाणार आहे. हजारोंना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. जिओ घराघरात गिगाफायबर सेवा पोचवणार आहे. शिवाय भारतातील 1600 शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाणार आहे. यामुळे रिलायन्सला मोठ्या प्रमाणावर इंजिनिअर लागणार आहेत. सध्या जिओमध्ये 6 हजार इंजिनिअर काम करत आहेत. आणखी 15 हजार इंजिनिअर कंपनीला लागणार आहे. पुढील 12 महिन्यांत गिगाफायबरचे भक्कम जाळे उभारले जाणार आहे. तसेच मायक्रोसॉफ्टसोबत मिळून वर्ल्ड क्लास डेटा सेंटर उभारले जाणार आहे. 

जिओच्या गिगाफायबरचे प्लॅन्स 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. याचसोबत आणखी एका स्कीममध्ये मोफत 4के टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स मिळणार आहे. रिलायन्स करत असलेल्या विविध घोषणांमुळे नवीन उद्योग आणि रोजगार देखील निर्माण होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या  वार्षिक सर्वसाधारण बैठकीत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजविली होती. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबर बाजारात आणले आहे. येत्या 5 सप्टेंबरला जिओला तीन वर्ष पूर्ण होणार आहेत. जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

जिओ आता स्टार्टअप कंपन्यांसाठी क्लाऊड सर्व्हिस मोफत देणार आहे. ही सेवा 1 जानेवारीपासून दिली जाणार असून लघू, मध्यम व्यवसाय जोडणीसाठी 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी यापुढे फक्त 1500 रुपये खर्च येणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com