जिओमुळे पुन्हा ग्राहकांना येणार 'अच्छे दिन'!

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

मुंबई: दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून रिलायन्स जिओ नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता जिओच्या गिगाफायबर सेवेमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे. जिओ फोननंतर आता गिगाफायबर सेवेची सर्व ग्राहकांना प्रतिक्षा आहे. जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी काही शहरांमध्ये सुरु झाली असून कमर्शिअल लाँचनंतर   ग्राहकांसाठी सेवा सुरु करण्यात येणार आहे. जिओ आता फायबर ऑप्टीकचा वापर करणार असल्याने आधीपेक्षा इंटरनेट स्पीड जादा मिळणार आहे.  जिओने 100Mbps स्पीडची प्रिव्ह्यू ऑफर देखील देऊ केली होती. यासाठी ग्राहकांना 4 हजार 500 रूपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट देणे गरजेचे होते.

मुंबई: दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून रिलायन्स जिओ नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता जिओच्या गिगाफायबर सेवेमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे. जिओ फोननंतर आता गिगाफायबर सेवेची सर्व ग्राहकांना प्रतिक्षा आहे. जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी काही शहरांमध्ये सुरु झाली असून कमर्शिअल लाँचनंतर   ग्राहकांसाठी सेवा सुरु करण्यात येणार आहे. जिओ आता फायबर ऑप्टीकचा वापर करणार असल्याने आधीपेक्षा इंटरनेट स्पीड जादा मिळणार आहे.  जिओने 100Mbps स्पीडची प्रिव्ह्यू ऑफर देखील देऊ केली होती. यासाठी ग्राहकांना 4 हजार 500 रूपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट देणे गरजेचे होते. ग्राहकांना यामध्ये अमर्यादित डेटा मिळतो आहे. 

जिओ गिगाफायबरचे प्लॅन काय असतील किंवा काय सेवा मिळणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे. आता मात्र गिगाफायबरच्या सुरूवातीच्या प्लॅनसाठी दरमहा 600 रूपये आकारले जाणार असून युझरला 50Mbps चा स्पीड मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय प्रीव्ह्यू सब्सक्रायबर्सना 100Mbps स्पीडच्या प्लॅनसाठी महिन्याला 1 हजार रूपये मोजावे लागणार आहेत. जिओच्या प्रत्येक योजनेबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. आता जिओ गिगाफायबरची सेवा पुन्हा एकदा या क्षेत्रात दरयुद्ध सुरु करण्याची शक्यता आहे. यामध्ये मात्र ग्राहकांना नक्की फायदा होईल. 

जिओ गिगाफायबरच्या माहितीबाबत जिओकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये कंपनीकडून याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jio GigaFiber prices leaked