'जिओ प्राइम'ची रक्कम अशी होणार वसूल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर सादर केली आहे. कंपनीच्या 'जिओ मनी' या अॅप्लिकेशनवरून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 50 रुपये 'कॅशबॅक' देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. 

एकदा 99 रुपयांमध्ये प्राइम सदस्य झाल्यावर ग्राहकांना मासिक सेवांसाठी 303 रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. यामुळे या दोन्ही रिचार्जनंतर ग्राहकांना प्रत्येकी 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यामुळे प्राइम सदस्यत्व मिळविण्यासाठी भरलेले पैसे वसूल होतील. 

कंपनीच्या विद्यमान 100 दशलक्ष ग्राहकांसह इतरांनाही 'जिओ प्राईम सदस्यत्व' या योजनेचा लाभ घेता येईल, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली होती. सर्वात आधी, 'जिओ प्राइम सदस्यत्व' योजनेंतर्गत केवळ एकदा भरावे लागणारे 99 रुपये सदस्य नोंदणी शुल्क भरून सध्या सुरु असलेल्या जिओ हॅपी ऑफरचा लाभ संपूर्ण वर्ष भर किंवा 31 मार्च 2018 पर्यत घेता येणार आहे. त्याच बरोबर त्यांना मासिक 303 रुपयांचा मासिक आकार पडणार आहे. 

Web Title: jio prime offers cashback