चांगली बातमी! रोजगारनिर्मितीचा वेग वाढतोय..! 

पीटीआय
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नवी दिल्ली : भारतातील सेवा क्षेत्राने गेल्या महिन्यापासून पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गेल्या सात वर्षांत प्रथमच रोजगारनिर्मितीचा वेग वाढला असल्याचा निष्कर्ष आर्थिक क्षेत्रातील एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. 

देशातील सेवा क्षेत्राच्या वाढीसंदर्भात 'निक्की इंडिया सर्व्हिसेस बिझनेस ऍक्‍टिव्हिटी इंडेक्‍स'मध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये गुणांकन वाढले आहे. या सर्वेक्षणात फेब्रुवारीमध्ये 47.8 गुणांक होते; तर मार्चमध्ये 50.3 गुणांक मिळाले आहेत. याचाच अर्थ, गेल्या महिन्यात सेवा क्षेत्र स्थिर झाले असून आता वाढीची चिन्हे दिसू लागली आहेत. 

उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये मागणी वाढली आहे. यामुळे 2011 च्या जूननंतर प्रथमच रोजगारनिर्मितीचा वेग प्रथमच वाढला आहे. दुसरीकडे, भारतातील सेवा क्षेत्रातील संस्थांसमोर खर्चाचा अतिरिक्त बोजा पडत असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या समस्येला सामोरे जाणे, हेदेखील नजीकच्या काळात या संस्थांसमोरील आव्हान असेल. 

यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिले द्विमाही पतधोरण आज (गुरुवार) जाहीर होणार आहे. 

देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आणण्यासाठी सरकारने सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांचे फळ आता दिसत आहे. नजीकच्या काळातही रोजगारनिर्मितीचा हा वेग कायम राहण्याची शक्‍यता असल्याचेही सर्वेक्षणातील विविध घटकांच्या अभ्यासातून दिसून येत आहे. 
- आश्‍ना दोधिया, अर्थतज्ज्ञ 

Web Title: Job creation at 7-year high in March, services sector back on growth track