कंत्राटप्राप्तीनंतर ‘कल्पतरु पॉवर’चा शेअर 4.4 टक्के तेजीत

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई: कल्पतरु पॉवर ट्रान्समिशनचा शेअर आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात 4.4 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीला सुमारे 825 कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत. शनिवारी यासंदर्भातील घोषणेचा आज कंपनीच्या शेअरवर परिणाम झाला आहे.

कंपनीला अफ्रिका आणि राष्ट्रकुल विभागात ट्रान्समिशन लाइन्स आणि सबस्टेशन्सच्या स्थापनेचे तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि गेल इंडियाच्या 277 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. त्याचप्रमाणे, कंपनीला रेल्वे विद्युतीकरण केंद्रीय संस्थेकडून 111 कोटी रुपयांचे कंत्राटदेखील मिळाले आहे. अफ्रिकेतून मिळणाऱ्या कंत्राटांचे प्रमाण वाढले असून वर्षअखेर ऑर्डर बुकमध्ये चांगली वाढ होईल, असे कंपनीने सांगितले आहे.

मुंबई शेअर बाजारात आज(सोमवार) कंपनीचा शेअर 275 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 268.35 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 276 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 26 मिनिटे) कंपनीचा शेअर 269.15 रुपयांवर व्यवहार करत असून 1.62 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: kalpataru power share price 4.4%