अरेबियन ट्रॅव्हल मार्केटमध्ये कर्नाटकने वेधले लक्ष 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नवी दिल्ली : दुबईत नुकत्याच झालेल्या ‘अरेबियन ट्रॅव्हल मार्केट २०१८’मध्ये (एटीएम) कर्नाटकने लक्ष वेधून घेतले. ‘एटीएम’मधील कर्नाटकच्या सहभागामुळे आगामी काळात राज्यात आखाती देशांमधील पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्‍वास पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे. कर्नाटकमधील विविधता, वारसा, संस्कृती, निसर्ग, किनारे आणि वन्यजीव या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याचबरोबर गिरिस्थाने, धबधबे, धार्मिक स्थळांसाठी कर्नाटक प्रसिद्ध आहे. या विविधतेमुळे अनेक क्षेत्रांतील पर्यटकांना कर्नाटक आकर्षित करीत आहे.

नवी दिल्ली : दुबईत नुकत्याच झालेल्या ‘अरेबियन ट्रॅव्हल मार्केट २०१८’मध्ये (एटीएम) कर्नाटकने लक्ष वेधून घेतले. ‘एटीएम’मधील कर्नाटकच्या सहभागामुळे आगामी काळात राज्यात आखाती देशांमधील पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्‍वास पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे. कर्नाटकमधील विविधता, वारसा, संस्कृती, निसर्ग, किनारे आणि वन्यजीव या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याचबरोबर गिरिस्थाने, धबधबे, धार्मिक स्थळांसाठी कर्नाटक प्रसिद्ध आहे. या विविधतेमुळे अनेक क्षेत्रांतील पर्यटकांना कर्नाटक आकर्षित करीत आहे. ‘एटीएम’मध्ये कर्नाटकने ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत असलेल्या हंपीच्या स्थापत्यकलेचा नमुना पॅव्हिलियनमध्ये सादर केला होता. याचवेळी पार्श्‍वभूमीला कर्नाटकमधील प्राणिजीवनाचा ठळकपणे उल्लेख होता.

कर्नाटक पर्यटन विभागाचे शिष्टमंडळ संचालक डॉ. मंजुला एन. यांच्या नेतृत्वाखाली ‘एटीएम’मध्ये सहभागी झाले होते. याचबरोबर खासगी क्षेत्रातील सिट्रस हॉटेल अँड रिसॉर्टस, इबिनी स्पा रिसॉर्ट, शतायू योगा रिट्रिट, स्वस्वरा आणि विंडफ्लॉवर स्पा अँड रिसॉर्ट यांचे प्रतिनिधी ‘एटीएम’मध्ये सहभागी झाले होते. या वेळी डॉ. मंजुला एन. म्हणाल्या, ‘‘मागील काही वर्षांपासून ‘एटीएममध्ये कर्नाटक सहभागी होत आहे. येथे जागतिक पर्यटन व्यापार उद्योगाशी भेटी होऊन व्यवसायाबाबत चर्चा होत आहे. आखाती देशातील ‘एटीएम’ सर्वांत मोठे पर्यटन प्रदर्शन आहे. येथे आम्हाला चांगल्या संधी आणि व्यवसाय मिळत आहे. विशेषत: आखाती देशांमधून वन्यजीव आणि वेलनेससाठी व्यवसायाच्या संधी मिळत आहेत.’’

Web Title: Karnatak focuses on the Arabian travel market