किआ मोटर्सच्या वाहनविक्रीचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

काही महिन्यांपूर्वीच भारतात विक्री सुरू करण्यात आलेल्या किआ मोटर्सची सेल्टोस गाडी ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वीच भारतात विक्री सुरू करण्यात आलेल्या किआ मोटर्सची सेल्टोस गाडी ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. विशेष म्हणजे अवघ्या ७० दिवसांत किआच्या सेल्टोस मॉडेलच्या २६ हजार ८४० गाड्यांची विक्री झाली. सध्या भारतीय वाहन बाजारात सर्वाधिक विकली गेलेली एसयूव्हीचा मान या गाडीला मिळाला आहे.

या गाडीत इतर एसयूव्ही गाड्यांच्या तुलनेत नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. वॉइस रेकोग्निशन, ब्लूटूथ कनेक्‍टिविटी, फॉलो मी होम हेडलॅंप्स, स्टेरिंग माउंटेड ऑडिया कंट्रोल्स इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत. 

किआ सेल्टोस ही विविध प्रकारांत उपलब्ध असून याच्या सुरुवातीच्या मॉडेलची दिल्लीतील एक्‍सशोरूम किंमत ९ लाख ६९ हजार आहे; तर टॉप मॉडेलची एक्‍सशोरूम किंमत १५ लाख ९९ हजार इतकी आहे. सध्या सेल्टोसच्या तुलनेत ह्युंडाई कंपनीची क्रेटा, टाटा कंपनीची हॅरियर आणि एमजी हेक्‍टर या गाड्या असून या सर्वांवर मात करत सेल्टॉसने सर्वाधिक विक्री झालेल्या एसयूव्हीचा मान मिळवला आहे.

web title : Kia Motors vehicle sales record


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kia Motors vehicle sales record