कोलते पाटील डेव्हलपर्स’ची उत्तम कामगिरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

पुणे: कोलते पाटील डेव्हलपर्स लि. या आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षात तिमाहीत उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच कंपनीने "थ्री ज्वेल्स' या बांधकाम प्रकल्पातील पहिला टप्पा निर्धारित वेळेत म्हणजेच 36 महिन्यांत पूर्ण केला आहे. या पुढच्या काळात प्रिमियमपासून ते अफोर्डेबल अशा सर्व गटातील गृहप्रकल्प साकारले जाणार आहेत, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल सारडा यांनी सांगितले.

कंपनीने 2016-17 या आर्थिक वर्षाचे निकाल नुकतेच जाहीर केले. या वर्षात कंपनीच्या महसुलात 28 टक्के वाढ होऊन हा आकडा 965.6 कोटी रुपयांवर पोचला. करपश्‍चात नफ्यात तब्बल 48 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, हा नफा 87.2 कोटी रुपये इतका नोंदला गेला. त्याआधीच्या वर्षी तो 58.9 कोटी रुपये होता. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिशेअर रु. 1.60 इतक्‍या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील "थ्री ज्वेल्स' या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 800 हून अधिक सदनिकांचे बांधकाम निर्धारित पूर्ण करण्यात कंपनीने यश मिळविले आहे. सध्याची बांधकाम क्षेत्राची परिस्थिती बघता ही कामगिरी ग्राहकांसाठी नक्कीच आनंददायी आहे, असे श्री. सारडा म्हणाले. या वेळी संस्थेच्या विपणन विभागाच्या उपाध्यक्षा गायत्री कुंटे आणि विक्री विभागाच्या प्रमुख निधी श्रीवास्तव उपस्थित होत्या.

"थ्री ज्वेल्स'च्या पहिल्या टप्प्यातील सदनिका राहण्यासाठी तयार असून, त्यासाठी आवश्‍यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. पुण्याबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्राच्या अनेक शहरांतील नागरिकांकडून या प्रकल्पाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 754 सदनिकांचा समावेश असेल. हा "गेटेड कम्युनिटी' प्रकल्प असून, यामध्ये आधुनिक जीवनशैलीच्या सर्व सोयी-सुविधा आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Kolte Patil Developers' Best Performance