ITR उशिरा भरणाऱ्यांना 10 हजारांचा दंड?

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) उशिरा भरणाऱ्या करदात्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. मात्र, पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

करदात्यांना वेळेत विवरणपत्र भरायला लावण्यासाठी सरकार पुढील 'असेसमेंट इयर'पासून (2018-19) प्राप्तिकर कायद्यात नव्या कलमाची (234 F) तरतूद करण्याचा विचार करीत आहे. याअंतर्गत, उशिराने विवरणपत्र भरणाऱ्यांना दंड लावण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थविधेयक 2017 मध्ये सेक्शन 139 (1) मध्ये प्राप्तिकर विवरणपत्रासंदर्भातील नियम आहेत.

अंतिम तारखेनंतर मात्र 31 डिसेंबरपूर्वी विवरणपत्र भरल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. त्यानंतर, विवरणपत्र भरणाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. हे बदल 1 एप्रिल, 2018 पासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: late latifs in ITR filing may be charged fine of ten thousand