esakal | अनिल अंबानींनंतर लक्ष्मी मित्तल यांचे भाऊही दिवाळखोर; पत्नीसह वडिलांकडून अब्जावधींचे कर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

pramod mittal

मुलीच्या लग्नासाठी 500 कोटी रुपये खर्च करणाऱ्या प्रमोद मित्तल यांच्याकडे आता फक्त दीड कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची माहिती स्वत: प्रमोद मित्तल यांनी दिली असून त्यात ज्वेलरी, शेअर्स आणि दिल्लीतील जमिनीचा समावेश आहे.

अनिल अंबानींनंतर लक्ष्मी मित्तल यांचे भाऊही दिवाळखोर; पत्नीसह वडिलांकडून अब्जावधींचे कर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांमध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल अंबानी कर्जात बुडाल्यामुळे चर्चेत आले होते. यातच आता आणखी एका श्रीमंत व्यक्तीच्या भावाची अवस्था अनिल अंबानी यांच्यासारखीच झाली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या लक्ष्मी निवास मित्तल यांचा भाऊ प्रमोद मित्तल ब्रिटनमधील सर्वात दिवाळखोर व्यक्ती बनले आहेत. प्रमोद मित्तल यांच्यावर सध्या जवळपास 2.5 अब्ज पाउंड म्हणजेच सुमारे 24 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. इतकं मोठं कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याजवळ एकही रुपया नाही. 

मुलीच्या लग्नासाठी 500 कोटी रुपये खर्च करणाऱ्या प्रमोद मित्तल यांच्याकडे आता फक्त दीड कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची माहिती स्वत: प्रमोद मित्तल यांनी दिली असून त्यात ज्वेलरी, शेअर्स आणि दिल्लीतील जमिनीचा समावेश आहे. घरातल्या व्यक्तींसह नातेवाइकांकडून अब्जावधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यामध्ये 94 वर्षीय वडिलांकडून जवळपास 16 अब्ज, पत्नी संगिता यांच्याकडून साडे दहा कोटी, मुलाकडून 23 कोटी तर पत्नीच्या बहिणीकडून साडे दहा कोटी रुपये घेतले आहे. 

14 वर्षांपूर्वीच्या चुकीने दिवाळखोरीची वेळ
प्रमोद मित्तल 14 वर्षांपूर्वी बोस्नियातील कोक निर्मिती कंपनीच्या कर्जासाठी जामीन बनले होते. त्यानंतरच प्रमोद मित्तल यांना सातत्यानं मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यांची कंपनी ग्लोबल स्टील होल्डिंग्स ही GIKIL साठी जामीन राहिली आणि त्यानंतर कंपनीच दिवाळखोरीत निघाली. मूरगेट इंडस्ट्रीजकडून घेतलेलं कर्ज फेडता आली नाही. ज्यावेळी हे पैसे देण्याची मुदत संपली तेव्हा कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

हे वाचा - बँक ग्राहकांवर आता शुल्कवाढीचा भुर्दंड; एटीएमच्या नव्या नियमाबाबत विचार सुरु

जामीन राहिलेल्या कंपन्यांचे कर्ज डोक्यावर
2017 मध्ये ऑर्बिटरेशन कोर्टाने आणखी एका बोस्नियाच्या कंपनीच्या दिवाळखोरी प्रकरणात मूरगेटच्या बाजूने निर्णय दिला होता. तेव्हादेखील प्रमोद मित्तल त्या कंपनीच्या कर्जासाठी जामीन होते. ते कर्जही प्रमोद मित्तल यांच्याच डोक्यावर आले. या कर्जासाठी मूरगेट इंडस्ट्रीजने कोर्टात धाव घेतली होती. याचा निकाल जून 2020 मध्ये प्रमोद मित्तल यांच्याविरोधात लागला. न्यायालयाने प्रमोद मित्तल यांना 14 हजार कोटी रुपये आणि याशिवाय 10 हजार कोटी रुपयांचे व्याज देण्याचा आदेशही दिला. 

भावाने दोन वेळा सोडवलं पण..
प्रमोद मित्तल यांचे मोठे भाऊ लक्ष्मी मित्तल त्यांना मत करत नाहीत. याआधी दोन वेळा प्रमोद यांना लक्ष्मी मित्तल यांनी मदत केली आहे. एकदा प्रमोद मित्तल फसवणुकीच्या प्रकरणात अडकले होते. तर दुसऱ्या एका प्रकरणात 84 कोटी रुपयांच्या प्रकरणामध्ये 92 कोटी रुपयांची जामीन रक्कम भरून सोडवलं होतं. 

हे वाचा - हिरो इलेक्ट्रिकची Hero Nyx HX स्कूटर लाँच; जाणून घ्या फिचर्स

मुलीच्या लग्नात खर्च केले होते 500 कोटी
एक काळ असाही होता की प्रमोद मित्तल यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात वारेमाप पैसा खर्च केला होता. 2013 मध्ये त्यांनी मुलीचे लग्न इन्व्हेस्टमेंट बँकर गुलराज बहल याच्याशी लावून दिलं होतं. या लग्नात प्रमोद मित्तल यांनी 500 कोटी रुपये खर्च केले होते. त्याचवेळी लक्ष्मी मित्तल यांनी त्यांच्या स्वत:च्या मुलीच्या लग्नासाठी 400 कोटी रुपये खर्च केले होते. 

loading image