चुकीचे विवरणपत्र  नोकरदारांना भोवणार  

पीटीआय
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नवी दिल्ली -  नोकरदार वर्गाने प्राप्तिकर विवरणपत्रांत उत्पन्न कमी अथवा वजावट अधिक दाखविल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, संबंधित नोकरदाराच्या कंपनीला त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे.  

नवी दिल्ली -  नोकरदार वर्गाने प्राप्तिकर विवरणपत्रांत उत्पन्न कमी अथवा वजावट अधिक दाखविल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, संबंधित नोकरदाराच्या कंपनीला त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे.  

प्राप्तिकर विवरणपत्रांची प्रक्रिया करणाऱ्या बंगळूरमधील प्राप्तिकर विभागाच्या केंद्रीय प्रक्रिया केंद्राने याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. यात म्हटले आहे, की काही कर सल्लागार चुकीच्या मार्गाने अथवा खोट्या माहितीच्या आधारे कर फायदे मिळवून देतात. करदात्यांनी कर फायदे मिळविण्यासाठी फसवणूक करणाऱ्या अशा कर सल्लागारांच्या आहारी जाऊ नये. नोकरदार वर्गाकडून उत्पन्न कमी दाखवणे, वजावट अधिक दाखवणे अथवा सवलत जादा दाखवणे, याला करचुकवेगिरी म्हणून गृहीत धरले जाणार आहे. असे प्रकार केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद प्राप्तिकर कायद्यात आहे. विवरणपत्रात चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाईसोबत परतावाही उशिरा मिळणार आहे. 

विवरणपत्रात चुकीची माहिती दिलेली आढळल्यास संबंधित नोकरदाराच्या कंपनीला त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. 

केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही चौकशी
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी विवरणपत्रात चुकीची माहिती दिल्यास दक्षता विभागाला याची माहिती देऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच, अन्य केंद्रीय तपास यंत्रणांना याबाबत माहिती देऊन चौकशीच्या सूचना करण्यात येतील.

Web Title: Legal action will be taken if the employer has shown income reduction or deduction in income tax returns