कर्जदार बॅंका "जेट एअरवेज"मधील हिस्सा विकणार 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

मुंबई: जेट एअरवेजमधील हिस्सा विक्री करण्याचा निर्णय कंपनीला कर्ज दिलेल्या बॅंकांनी घेतला आहे. "एसबीआय"च्या नेतृत्वातील बॅंकांच्या समूहाकडून शनिवार (ता.6) निविदा मागवण्यात येणार आहेत. कर्जवसुलीच्यादृष्टीने हिस्सा विक्रीसह इतर पर्यायांचीदेखील चाचपणी केली जाणार असल्याचे संकेत बॅंकांनी दिले आहेत. 

आर्थिक संकटात सापडलेल्या "जेट एअरवेज"कडून सध्या 30 कमी विमाने सेवेत वापरली जात आहेत. जेट एअरवेजवर आठ हजार कोटींचे कर्ज आहे. जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदीसाठी इच्छुकांकडून 6 ते 9 एप्रिल दरम्यान निविदा मागवण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात "जेट"मधील मालकी हिस्सा बॅंकांनी घेतला होता. त्यावेळी तातडीने 1 हजार 500 कोटींची मदत देण्यात आली होती. कंपनीला आवश्‍यक भांडवल पुरवण्यासंदर्भात बॅंकांच्या अटी आणि शर्थींना संमती असल्याचे "जेट"चे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दरम्यान हिस्सा विक्रीतून कर्ज वसुलीची रक्कम वसूल न झाल्यास इतर पर्यायदेखील खुले असल्याचे बॅंकांनी स्पष्ट केले आहे. 

इंधन पुरवठा खंडीत 
दरम्यान "जेट एअरवेज" मागील शुल्ककाष्ठ संपण्याची नाव घेत नसून इंडियन ऑईलने गुरूवारी (ता.4) "जेट"चा काही काळ इंधन पुरवठा खंडीत केला होता. बिलाची थकबाकी न दिल्याने इंडियन ऑईलने हवाई इंधनाचा पुरवठा खंडीत केला होता. भाडे न दिल्याने कंपनीची निम्म्याहून अधिक विमाने जमीनवर आहेत. आता इंधनाचा पुरवठा खंडीत झाल्यास कंपनीच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Lenders to invite bids for selling stake in Jet Airways from April 6th to 9th