वेणुगोपाल, शर्मा एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई: बी. वेणुगोपाल आणि सुनिता शर्मा यांची नुकतीच पदोन्नतीने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. पदोन्नतीपूर्वी वेणुगोपाल महामंडळाच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख तर सुनिता शर्मा एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. शर्मा यांच्या कार्यकाळात एलआयसी हाऊसिंग फायनान्सने एक लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा पार केला होता.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महामंडळाने केलेल्या वाटचालीत वेणुगोपाल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली महामंडळाच्या पश्‍चिम विभाग विमा व्यवसायात सातत्याने आघाडीवर राहिला आहे.

Web Title: LIC gets two more MDs in B. Venugopal, Sunita Sharma