एलआयसी-आयडीबीआय व्यवहार सप्टेंबरअखेरीस पूर्ण होणार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबई - भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) आयडीबीआय बॅंकेतील ५१ टक्के हिस्सा खरेदीचा व्यवहार सप्टेंबरअखेरीस पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. नुकताच विमा नियामकाने (आयआरडीए) एलआयसीला बॅंकेतील हिस्सा खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. एलआयसीकडून बॅंकेची मालमत्ता, बुडीत कर्जे, स्थावर मालमत्ता यांचा आढावा घेण्यात येत आहे. या व्यवहारामुळे एलआयसीला आयडीबीआय बॅंकेच्या दोन हजार शाखांमध्ये विमा उत्पादने विक्री करता येणार आहेत. बॅंकेला एलआयसीचे कोटी विमाधारक खाते सुरू करण्यासाठी उपलब्ध होतील.

Web Title: LIC-IDBI transaction will be completed by September