
LIC Jeevan Akshay Policy : LIC ची धमाका ऑफर; एकच हफ्ता भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा!
LIC Jeevan Akshay Policy : प्रत्येक व्यक्तीचे काम करण्याचे एक वय असते. यानंतर निवृत्ती घ्यावी लागते. पण निवृत्तीनंतर खर्च कसा भागवणार? म्हणूनच निवृत्तीचे नियोजन आवश्यक आहे. एखादी व्यक्ती जितक्या कमी वयात सेवानिवृत्तीचे नियोजन सुरू करेल, तितका मोठा निधी तो तयार करू शकेल. भारतात सेवानिवृत्ती नियोजनाचा विचार केला तर ते एलआयसीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. एलआयसी आपल्या ग्राहकांना अनेक पेन्शन योजना ऑफर करते.
निवृत्तीनंतर जर तुम्हाला दर महिन्याला चांगले नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी तुमच्या कामी येऊ शकते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाची ही योजना बरीच प्रसिद्ध आहे.
विशेष म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा पैसे गुंतवावे लागत नाहीत. आपल्याला फक्त एकदा गुंतवणूक करावी लागेल आणि नंतर निवृत्तीनंतर आपल्याला नियमित उत्पन्न मिळण्यास सुरवात होईल.
एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळू शकतो. पेन्शनचे निकष तुम्ही केलेल्या गुंतवणुकीनुसार अवलंबून असतील. पेन्शन रकमेची गणना तुमच्या गुंतवणुकीनुसार केली जाते.
ही पॉलिसी सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपटिंग आणि वैयक्तिक वार्षिकी योजना आहे. म्हणजेच, एकदा पैसे जमा केले की आयुष्यभरासाठी तुमचे उत्पन्न निश्चित होते. यासाठी गुंतवणूकदारांसाठी वयोमर्यादा ३० ते ८५ वर्षे आहे.
जीवन अक्षय पॉलिसी ही सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अॅन्युइटी योजना आहे. यामध्ये तुम्ही 1 लाख रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. जर तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल.
तुम्ही जितके जास्त प्रीमियम वाढवाल, त्यानुसार तुमची पेन्शन वाढेल. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. त्यामुळे तुमची गुंतवणूकही तशीच असेल तर तुम्ही हवी तेवढी पेन्शन घेऊ शकता.
ही पॉलिसी 35 वर्षे ते 85 वर्षे वयोगटातील लोक खरेदी करू शकतात. अपंग व्यक्तीही या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. पॉलिसीमध्ये तुम्हाला दरमहिन्याला पेन्शन घेण्यासाठी 10 पर्याय मिळतात. तसे तर मासिकाव्यतिरिक्त तुम्ही तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावरही पेन्शन घेऊ शकता.
एलआयसीची ही पॉलिसी तुम्ही कुणासोबतही जॉइंटमध्ये ओपन करू शकता. खाते सुरू केल्यानंतर 3 महिन्यांनंतर डिपॉझिट रकमेवर कर्ज देखील घेऊ शकता.
कर्जही मिळू शकते
पेन्शन मिळवण्यासाठी १० पर्यायया पॉलिसीमध्ये दरमहा पेन्शन मिळविण्यासाठी १० पर्याय उपलब्ध आहेत. एलआयसीची ही पॉलिसी सिंगल किंवा जॉइंट फॉर्ममध्ये खरेदी करण्याची सुविधा देखील उपलब्ध असून पॉलिसी जारी केल्याच्या तीन महिन्यांनंतर तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते.