एलआयसी कडून 'जीवन उमंग' योजना दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 मे 2017

गेल्या वर्षी शेअरमध्ये 40 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. यंदाही त्याच प्रमाणात केली जाईल, असे शर्मा यांनी सांगितले. महामंडळाचे भांडवल आणि विमाधारकांचे हिताचे रक्षण करूनच गुंतवणूक केली जाईल, त्यांनी स्पष्ट केले

मुंबई - आयुर्विमा क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मंगळवारी जीवन उमंग योजना लाँच केली. ९० दिवसापासून 55 वर्षांपर्यंत व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात.

विमा धारकांना चांगला परतावा मिळावा या उद्देशाने एलआयसी शेअर बाजारात गुंतवणूक करते. एलआयसी बाजारातील ट्रेडर नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष व्ही. के शर्मा यांनी सांगितले. गेल्या वर्षी शेअरमध्ये 40 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. यंदाही त्याच प्रमाणात केली जाईल, असे शर्मा यांनी सांगितले. महामंडळाचे भांडवल आणि विमाधारकांचे हिताचे रक्षण करूनच गुंतवणूक केली जाईल, त्यांनी स्पष्ट केले.

एलआयसी शेअर बाजारातील सर्वात मोठी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार आहे

Web Title: LIC launches Jeevan Umang scheme