LIC's Jeevan Tarun Policy : 3 महिन्यांच्या बाळाच्या नावेही सुरू करू शकता गुंतवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC's Jeevan Tarun Policy

LIC's Jeevan Tarun Policy : 3 महिन्यांच्या बाळाच्या नावेही सुरू करू शकता गुंतवणूक

LIC's Jeevan Tarun Policy : एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी स्कीम्स आणत असते. एलआयसीमध्ये प्रत्येक वर्गातील लोकांसाठी स्कीम्स आहेत. अशात आता एलआयसीने लहान मुलांना लक्षात घेऊन जीवन तरुण पॉलिसी आणली आहे.

हा एक प्रकारचा पार्टिसिपेटिंग नॉन-लिंक्ड लिमिटेड प्लॅन आहे. यात तुम्ही तुमच्या मुलांच्या सुरक्षेसोबतच बचत करू शकता. मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.

वयोमर्यादा

जीवन तरुण पॉलिसी घेण्यासाठी मुलाचे वय कमीत कमी 90 दिवस आणि जास्तीत जास्त 12 वर्ष असावे. या पॉलिसीसाठी, मुलाच्या वयाच्या 20 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागेल. मूल 25 वर्षांचे झाल्यानंतर तुम्हाला पॉलिसीचा लाभ मिळेल.

एलआयसी जीवन तरुण पॉलिसी किमान विमा रक्कम 75,000 रुपये आहे. यासाठी कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. ही पॉलिसी फक्त मुलाच्या नावानेच घेता येते आणि यातून मिळणारी रक्कम मुलाकडे जाते.
 

हेही वाचा: Liquor stocks :व्होडका-व्हिस्की विकणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल...

एलआयसी जीवन तरुण पॉलिसीमध्ये तुमचे मूल 20 वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये तुमच्या सोयीनुसार तुम्ही तीन महिने, सहा महिने आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता. जर तुम्ही जीवन तरुण पॉलिसीमध्ये दररोज 150 रुपये गुंतवले तर वार्षिक प्रीमियम 54000 रुपये असेल.

म्हणजे 8 वर्षात तुमची गुंतवणूक 4 लाख 32 हजार होईल. यासोबतच तुम्हाला गुंतवणुकीवर 2,47,000 रुपयांचा बोनस मिळेल. या पॉलिसीची विमा रक्कम 5 लाख रुपये असेल. त्यानंतर तुम्हाला लॉयल्टी बोनस म्हणून 97000 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला या पॉलिसी अंतर्गत 8 लाख 44 हजार 550 रुपये मिळतील.

हेही वाचा: LIC Policy: एलआयसीच्या जीवन शिरोमणी स्कीममध्ये आरामात बनेल 1 कोटीचा फंड, वाचा कसं?

जोखीम सुरू होण्यापूर्वी पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम, अतिरिक्त प्रीमियम, रायडर प्रीमिय, व्याज आणि कर काढून उरलेली रक्कम दिली जाते. दुसरीकडे, जोखीम सुरू झाल्यानंतर पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वार्षिक प्रीमियमच्या 10 पट रक्कम दिली जाईल किंवा 125 टक्के विमा रक्कम दिली जाईल.

हेही वाचा: Share Market Opening Update : शेअर बाजारात पडझडीचं सत्र थांबलं, सेन्सेक्सने घेतली भरारी

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.