एसएमएसद्वारे जोडा पॅन आणि आधार: प्राप्तिकर विभाग

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

प्राप्तिकराशी निगडीत सुविधांचा लाभ घेण्यासाठी या दोन्ही क्रमांकांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. नव्या पॅन कार्डासाठी अर्ज करताना आधार क्रमांक नमूद केल्यास ते एकमेकांशी जोडले जातील.

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी एसएमएस सुविधा सादर केली आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवरुन पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि नाव टाईप करून 567678 किंवा 56161 क्रमांकावर एसएमएस केल्यास काही वेळातच त्यांचे पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले जाईल, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. अनेक राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात प्रसिद्ध करुन जनजागृती निर्माण केली जात आहे.

प्राप्तिकराशी निगडीत सुविधांचा लाभ घेण्यासाठी या दोन्ही क्रमांकांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. नव्या पॅन कार्डासाठी अर्ज करताना आधार क्रमांक नमूद केल्यास ते एकमेकांशी जोडले जातील. नागरिकांना आधार क्रमांकासह पॅन कार्ड नव्याने छापण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे.

नागरिकांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरुनदेखील ही जोडणी करता येणार आहे. संकेतस्थळावर दोन लिंक उपलब्ध आहेत. पहिल्या लिंकवर क्लिक करुन पॅन कार्डातील चुका दुरुस्त करण्यासाठी नव्या पॅन कार्डसाठीदेखील अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे, आधार कार्डावरील तपशीलात बदल करण्यासाठी दुसरी स्वतंत्र लिंक उपलब्ध आहे.

देशातील सर्व नागरिकांना येत्या 1 जुलैपर्यंत पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर आपल्या आधार कार्डासोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार असून ते कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अपात्र असेल असेही सरकारने स्पष्ट केले आहे. प्राप्तिकर संकलन वाढवत करचुकवेगिरी करणार्‍या लोकांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

(अर्थविषयक अधिक घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा)

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
बुलडाणा: पोलिसाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

Web Title: Link Aadhaar with PAN using SMS: Income Tax department