एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांना 2,799 कोटींचे कर्ज 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

बॅंक ऑफ महाराष्ट्रने योजनांविषयी ग्राहकांमधे जागरूकता वाढविण्यासाठी वेबिनार, एसएमएस, ईमेल, टेलि कॉलिंग इत्यादी माध्यमातून विविध उपाय योजना राबविल्या आहेत. 

पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रने एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांना 2779 कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातील 2327 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बॅंकेने ग्राहकांना आर्थिक तरलतेवर मात करण्यासाठी विविध योजनांद्वारे मंजूर मर्यादेपेक्षा अतिरिक्त कर्ज पुरवठा केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोविड-19 अंतर्गत एकूण 1,08,419 कर्जदारांना 1,65,316 लाखांचे कर्ज मंजूर केले. इसीएलजीएस योजनेंतर्गत 84,151 ग्राहकांना 1,72,498 लाखांचे कर्ज तर एसएलसी योजनेअंतर्गत 30 ग्राहकांना 1,128 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बॅंक ऑफ महाराष्ट्रने योजनांविषयी ग्राहकांमधे जागरूकता वाढविण्यासाठी वेबिनार, एसएमएस, ईमेल, टेलि कॉलिंग इत्यादी माध्यमातून विविध उपाय योजना राबविल्या आहेत. 

Edited By - Kalyan Bhalerao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loans of Rs 2799 crore to MSME sector industries

Tags
टॉपिकस
Topic Tags: