esakal | पायाभूत क्षेत्रातील उत्पादनाला घरघर 
sakal

बोलून बातमी शोधा

पायाभूत क्षेत्रातील उत्पादनाला घरघर 

पायाभूत क्षेत्रातील उत्पादनाला घरघर 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: कच्चे तेल आणि खत निर्मिती घट झाल्याचे नोव्हेंबर महिन्यात आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांतील उत्पादनाला घरघर लागली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर आठ प्रमुख क्षेत्रांची केवळ 3.5 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. गेल्या 16 महिन्यांतील हा नीचांकी दर आहे. या निराशाजनक कामगिरीचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 


कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा या अर्थव्यवस्थेतील आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांची नोव्हेंबर 2017 मध्ये 6.9 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. मात्र गेल्या महिन्यात कच्चे तेल आणि खत निर्मितीत नकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन उणे 3.5 टक्के आणि खतांच्या निर्मितीत उणे 8.1 टक्के वाढ झाली. नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, पोलाद आणि सिमेंट यांच्या उत्पादनात अनुक्रमे 0.5 टक्के, 2.3 टक्के, 6 टक्के आणि 8.8 टक्के वाढ झाल्याचे सरकारने म्हटले आहे. कोळसा उत्पादनात 3.7 टक्के आणि वीज निर्मितीत 5.4 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत प्रमुख क्षेत्राच्या उत्पादनात 5.1 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. 

loading image