गॅसचा भडका! सिलिंडरचे दर हजाराच्या घरात

cylinder
cylinderesakal
Summary

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्या तर स्वयंपाक बनवण्याचा गॅसही महाग होईल.

गॅस सिलिंडरचा वापर जवळपास सर्वच घरात होतो. यावेळी सणासुदीच्या दिवसात स्वयंपाकाच्या गॅससाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागू शकते. गेल्या आठवडाभरापासून, जिथे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, तिथे एलपीजी सिलेंडरच्या किंमती देखील वाढू शकतात. या किंमती 1000 चा आकडा पार करू शकतात. तसेच, 18 दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही बदलातही सुरुवातही झाली आहे.

cylinder
सणासुदीत गॅस सिलिंडर दरवाढीने अर्थकारण बिघडले

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाची किंमत 74.22 डॉलर प्रति बॅरल होती. सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 75 डॉलरच्या पुढे जाऊ शकतात. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढवण्याचा ट्रेंड कायम राहिल्यास त्याचा परिणाम तेलाच्या किमतींवर होऊ शकतो, अशा परिस्थितीत आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू शकतात.

cylinder
सामान्यांना झटका! यंदा सिलिंडर 165 रुपयांनी महागला

अमेरिकेतील तेलाचे साठे तीन वर्षांच्या नीचांकावर आणि नैसर्गिक वायू उत्पादनात घट झाल्याने तेलाच्या किमती वाढल्या. यानंतर, गुरुवारी ब्रेंट क्रूड 1.06 डॉलर वर चढून 77.25 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. यूएस क्रूड 1.07 डॉलर वाढून 73.30 डॉलर प्रति बॅरलवर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्या तर स्वयंपाक बनवण्याचा गॅसही महाग होईल. यासह, सरकार एलपीजी सबसिडी पूर्णपणे काढून टाकू शकते. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अनुदान (सबसीडी) फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जाऊ शकते. त्याचबरोबर सरकारच्या अंतर्गत सर्वेक्षणात ग्राहकांना एक हजार रुपयांचे सिलिंडर खरेदी करता येईल हे मान्य केले आहे.

cylinder
Video: 'सिलिंडर मॅन'ने तुकाराम मुंढेंचे का मानले आभार?

मंत्रालयाने अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. पण लवकरच सरकार यासंदर्भात निर्णय घेऊ शकते. या वर्षी 1 जानेवारीनंतर राजधानी दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 190.50 रुपयांची वाढ झाली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत किंमत दुपटीने वाढली आहे. सध्या देशातील निवडक राज्यांमध्ये एलपीजी सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ ग्राहकांना मिळत आहे. यामध्ये लडाख, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, ईशान्य राज्ये आणि काही राज्यांचा मागास भाग यांचा समावेश आहे. अनुदानावर 2021 या आर्थिक वर्षात सरकारने DBT अंतर्गत 3559 रुपये खर्च केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com