ऐन दिवाळीत सिलिंडरचा 'भडका'

cylinder
cylinder

नवी दिल्ली : ऐन दिवाळीत सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचे गिफ्ट मिळाले असून, अनुदानित सिलिंडरच्या दरात आजपासून (गुरुवार) 2 रुपये 94 पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली. 

आधार किमतीवरील करात बदल झाल्याने ही वाढ करण्यात आल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) सांगण्यात आले. नव्या दरवाढीमुळे आता दिल्लीत अनुदानित सिलिंडरची किंमत 505.34 रुपये झाली असून, सध्या ती 502.40 रुपये होती. 

तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेस सिलिंडरच्या आधार किमतीत बदल करतात. जूनपासून आतापर्यंत सहाव्यांदा सिलिंदरच्या वाढ करण्यात आली असून, तब्बल 14.13 रुपये वाढ झाली आहे.

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरातही तब्बल 60 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 880 रुपये असणार आहे. नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपये वाढ झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com